Skip to main content
Source
Dainik Prabhat
https://www.dainikprabhat.com/what-do-you-say-this-cm-has-the-most-money-eknath-shinde-is-at-this-number/
Author
प्रभात वृत्तसेवा
Date
City
New Delhi

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने नुकतंच देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. जगातील पाचवी आर्थिक महासत्ता म्हणून अशी नवी ओळख मिळालेल्या भारतातील अनेक मुख्यमंत्रीही गर्भश्रीमंत आहेत. आणि आता याच मुख्यमंत्र्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये अनेक महत्वाच्या राज्यातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांचे नावे देण्यात आली आहेत.

सध्याच्या विद्यमान 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे एडीआरने म्हटले आहे. यात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले असून त्‍यांच्याकडे एकूण 510 कोटींची मालमत्ता आहे. तर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 15 लाखांच्या संपत्तीसह शेवटच्या क्रमांकावर आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 11 व्या क्रमांकावर आहेत.

कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती वाचा….

आंध्र प्रदेश – 510.38 कोटी

अरुणाचल – 163.50 कोटी

ओडिशा – 63.87 कोटी

नागालॅंड – 46.95 कोटी

पद्दुचेरी – 38.39 कोटी

तेलगंणा – 23.55 कोटी

छत्तीसगड – 23.05 कोटी

आसाम – 17.27 कोटी

महाराष्ट्र – 11.56 कोटी

गोवा – 9.37 कोटी

कर्नाटक – 8.92 कोटी

तामीळनाडू – 8.88 कोटी

झारखंड – 8.51 कोटी

गुजरात – 8.22 कोटी

हिमाचल – 7.81 कोटी

मध्य प्रदेश – 7.66 कोटी

राजस्थान – 6.56 कोटी

दिल्ली – 3.44 कोटी

बिहार – 3.09 कोटी

पंजाब – 1.97 कोटी

हरयाणा – 1.27 कोटी

केरळ – 1.18 कोटी

पचिम बंगाल- 15 लाख