Date
City
Mumbai
राज्यात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या १४७ नगर परिषदा आणि १८ नगरपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान रविवारी होत असून एकूण २० हजार ७१६ उमेदवार यात आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी ७४३ उमेदवार कोट्यधीश असून ३९७ उमेदवारांनी शून्य मालमत्ता घोषित केली आहे. तर ११८६ उमेदवारांनी आपली मालमत्ता पन्नास हजारांपेक्षा कमी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे. राज्यभरातील १९ जिल्ह्यांमधे हे पहिल्या टप्प्याचे मतदान होत असून एकूण २० हजार ७१६ उमेदवारांपैकी तब्बल ९४९५ उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे या सर्वेक्षणासाठी तपासण्यात आली. या तपासणीनुसार ९४९५ पैकी ७४३ उमेदवार कोट्यधीश आहेत. फलटण नगर परिषदेच्या नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरलेल्या मधुबाला दिलीपसिंह भोसले या उमेदवाराकडे सर्वाधिक म्हणजे ४६ कोटी ९० लाख ७९ हजार इतकी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तर फलटणमधीलच रघुनाथराजे विक्रमसिंह निंबाळकर हे ३७ कोटी २८ लाख ११ हजार रुपयांच्या मालमत्तेसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
वेदांतिकाराजे ७१ कोटींच्या मालकीण
राज्यातील १४७ नगर परिषदांसाठी थेट नगराध्यक्ष निवडले जाणार असून यासाठी रविवार, २७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत साताऱ्याच्या वेदांतिकाराजे भाेसले. त्यांची एकूण संपत्ती ७१ कोटी आहे. नगराध्यक्षपदासाठी वेदांतिकाराजे यांच्यासह एकूण १ हजार १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.