Skip to main content
Source
The Focusindia
https://thefocusindia.com/national-news/the-countrys-4001-mlas-have-assets-worth-rs-54545-crore-more-than-the-budgets-of-3-north-eastern-states-200869/
Author
Pravin Pawar
Date
City
New Delhi

देशातील सुमारे 4 हजार आमदारांकडे एकूण 54,545 कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या 2023-24च्या एकूण बजेटपेक्षा ही जास्त आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता 13.63 कोटी रुपये आहे. एडीएआर या स्वयंसेवी संस्थेने 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 4033 पैकी 4001 आमदारांच्या निवडणूकपूर्व शपथपत्रांच्या आधारे संपत्तीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे.The country’s 4001 MLAs have assets worth Rs 54,545 crore, more than the budgets of 3 North-Eastern states

हे आमदार 84 राजकीय पक्षांचे असून त्यात अपक्षांचाही समावेश आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे 1,413 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. अपक्ष 95 आमदारांकडे एकूण 2,845 कोटी रुपये आहेत. भाजपच्या 1,356 आमदारांची संपत्ती 16,234 कोटी आणि काँग्रेसच्या 719 आमदारांची संपत्ती 15,798 कोटी आहे. एकूण संपत्तीमध्ये या दोन प्रमुख पक्षांच्या आमदारांचा एकूण वाटा 58.73% आहे.

यात अपक्ष आमदारांची सरासरी मालमत्ता 29.94 कोटी रुपये आहे. तर आमदारांची सरासरी मालमत्ता 13.63 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजेच सर्वात श्रीमंत वायएसआर पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या मालमत्तेची सरासरी 23.14 कोटी रुपये आहे.

The country’s 4001 MLAs have assets worth Rs 54,545 crore, more than the budgets of 3 North-Eastern states