लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १०२ जागांपैकी ४२ मतदारसंघांतील तीन किंवा अधिक उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १०२ जागांपैकी ४२ मतदारसंघांतील तीन किंवा अधिक उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. १,६१८ उमेदवारांपैकी २५२ उमेदवारांची नावे गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आहेत, अशी माहिती ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म’ (एडीआर) या संस्थेने दिली.
’१९ एप्रिल रोजी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. १,६२५ पैकी १,६१८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले.
’१,६१८ उमेदवारांपैकी १६ टक्के म्हणजेच २५२ उमेदवारांची नावे गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आहेत.
’१० टक्के म्हणजे १६१ उमेदवारांवर गंभीर गुन्हेगारी आरोप आहेत.
’७ उमेदवारांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत, तर १९ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.
’१८ उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे जाहीर केली आहेत आणि त्यापैकी एकावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा आरोप आहे.
’३५ उमेदवार द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांशी जोडलेले आहेत.
’१०२ जागांपैकी ४२ ‘रेड अॅलर्ट’ मतदारसंघ आहेत. ‘रेड अॅलर्ट’ मतदारसंघ म्हणजे
जिथे तीन किंवा अधिक उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणे घोषित केली आहेत.
कोणत्या पक्षांच्या उमेदवारांवर गुन्हे?
पक्ष उमेदवार
राष्ट्रीय जनता दल :सर्व ४ उमेदवार
द्रमुक : २२ पैकी १३
समाजवादी पक्ष : ७ पैकी ३
तृणमूल काँग्रेस : ५ पैकी २
भाजप : ७७ पैकी २८
काँग्रेस : ५६ पैकी १९
अण्णा द्रमुक : ३६ पैकी १३
बसप : ८६ पैकी ११
कुणाकडे किती संपत्ती?
’ पहिल्या टप्प्यातील २८ टक्के उमेदवार कोटय़धीश.
’ प्रत्येक उमेदवाराची सरासरी संपत्ती ४.५१ कोटी रुपये.
’ राष्ट्रीय जनता दलाचे चारही उमेदवार कोटय़धीश.
’ भाजपचे ७७ पैकी ६९ उमेदवार, काँग्रेसचे ७७ पैकी ६९ उमदेवार कोटय़धीश.
’ मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार नकुल नाथ यांची सर्वाधिक ७१६ कोटींची संपत्ती जाहीर.
’ त्यापाठोपाठ अण्णा द्रमुकचे इरोड (तमिळनाडू) मतदारसंघातील उमेदवार अशोक कुमार हे ६६२ कोटींचे धनी.
’ तमिळनाडूमधील शिवगंगा येथून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार देवनाथन यादव टी. यांची संपत्ती ३०४ कोटी.