Source: 
Esakal
https://www.esakal.com/desh/72-percent-of-bihar-ministers-face-criminal-cases-report-rad88
Author: 
सकाळ डिजिटल टीम
Date: 
17.08.2022
City: 
New Delhi

बिहारमधील नव्याने स्थापन झालेल्या 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, असे निवडणूक अधिकार मंडळ ADR ने म्हटले आहे. या शिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. (Bihar Ministers news in Marathi)

बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अलीकडेच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आरजेडीसोबत हातमिळवणी करणाऱ्या नितीश कुमार यांनी मंगळवारी 31 नवीन मंत्र्यांचा समावेश करून आपल्या नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी 10 ऑगस्ट रोजी शपथ घेतली होती.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि बिहार इलेक्शन वॉचने 2020 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या मुख्यमंत्र्यांसह 33 पैकी 32 मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे.

एक कॅबिनेट मंत्री आणि JD(U) चे अशोक चौधरी, जे विधान परिषदेचे नामनिर्देशित सदस्य आहेत, त्यांना त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाहीत. त्यामुले त्यांची गुन्हेगारी, आर्थिक आणि इतर तपशीलांची, ADR मध्ये उपलब्ध नाही असं अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, 23 मंत्र्यांनी (72 टक्के) फौजदारी खटले दाखल असल्याचं घोषित केलं आहे. तर 17 मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

© Association for Democratic Reforms
Privacy And Terms Of Use
Donation Payment Method