सुषमा स्वराज हुशार, नम्र आणि सामर्थ्यवान व्यक्तिमत्त्व, तसंच एक अतिशय प्रेमळ व्यक्ती होत्या. त्यांचा चैतन्यशील आणि उदार स्वभाव अशी त्यांची जगभर ओळख होती.
मुंबई, 07 ऑगस्ट : भारतीय जनता पार्टीच्या धडाडीच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सुषमा स्वराज या सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असायच्या. त्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुषमा स्वराज हुशार, नम्र आणि सामर्थ्यवान व्यक्तिमत्त्व, तसंच एक अतिशय प्रेमळ व्यक्ती होत्या. त्यांचा चैतन्यशील आणि उदार स्वभाव अशी त्यांची जगभर ओळख होती.
परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी अनेक लोकांना मदत केली. त्यांनी विदेशात फसलेल्या लोकांनाही मदत केली आहे. सुषमा स्वराज 7 वेळा लोकसभा सदस्य होत्या. बरं इतकंच नाही तर दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनी मिळवला होता. सुषमा स्वराज यांच्याकडे 32 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं सांगण्यात येत आहे.
एडीआर इंडिया (Association for Democratic Reforms)च्या वेबसाईटने दिलेल्या माहितीप्रमाणे, 2018च्या शेवटच्या एफिडेविटनुसार, सुषमा स्वराज याचे पती स्वराज कौशल यांच्याकडे 32 कोटींची संपत्ती आहे.
स्वराज यांची 19 कोटींची बचत
रिपोर्टनुसार, सुषमा आणि त्यांच्या पतीकडे 19 कोटींची बचत रक्कम आहे. ज्यामध्ये 17 कोटींची एफडीआर करण्यात आली आहे. सुषमा आणि स्वराज यांच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये 30 लाख रुपये बचक करण्यात आली आहे. सुषमा यांच्याकडे स्वत:ची कोणती गाडी नाही पण पती स्वराज यांच्याकडे 2017चं मॉडलची मर्सिडीज कार आहे. ज्याची किंमत 36 लाख रुपये आहे.
इतर बातम्या - आई-वडिलांचा होता स्पष्ट नकार, तरीदेखील सुषमा स्वराज यांनी केला प्रेमविवाह
सुषमा यांना होती ज्लेलरीची आवड
2018मध्ये सुषमा स्वराज यांनी राज्यसभा निवडणुकांसाठी इनकम एफिडेविड दिला होता. त्यामुध्ये नमुद केल्यानुसार त्यांना सोने आणि चांदीचे अलंकार घालण्याची खूप आवड होती. त्यांच्याकडे 29,34,000 रुपयांचे आभूषण आहेत.
स्वराज यांच्याकडे आहे कोट्यावधी रुपयांची संपत्ती
सुषमा आणि पती स्वराज यांच्याकडे मिळून कोटींची संपत्ती आहे. त्यांच्याकडे हरियाणा स्थित पलवलमध्ये शेती आहे. ज्याची किंमत 98 लाख रुपये आहे. सुषमा स्वराज यांच्या नावावर दिल्लीत पॉश परिसरात एक फ्लॅट आहे. या 3 बीएचके फ्लॅटची किंमत 2 कोटी आहे. तर स्वरात यांच्या नावावर मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 फ्लॅट आहे. त्यांच्या मुंबईतल्या फ्लॅटची किंमत 6 कोटी आणि दिल्लीतल्या फ्लॅटची किंमत 2 कोटी रुपये आहे. सगळ्यात विशेष गोष्ट ही की, सुषमा स्वराज यांच्यावर कोणतंही कर्ज नाही आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचे मालक त्यांचे पती असतील.