लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या टक्केवारीवरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. प्रत्येक टप्प्याचे मतदान झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांनी अंतिम आकडेवारी जाहीर केली जात होती. त्यावरून विरोधकांनी मोठा विरोधही केला.
लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या टक्केवारीवरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. प्रत्येक टप्प्याचे मतदान झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांनी अंतिम आकडेवारी जाहीर केली जात होती. त्यावरून विरोधकांनी मोठा विरोधही केला. त्यानंतर आता भारतीय राजकारण आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणारी संघटना ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ च्या एका अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या अहवालानुसार लोकसभा निवडणुकीत जवळपास 5 लाख 54 हजार 598 मतांचा घोळ झाल्याचे आढळून आले आहे.
एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) चे संस्थापक प्रो. जगदीप छोकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 538 मतदारसंघात पडलेल्या आणि मोजण्यात आलेल्या मतामंध्ये मोठी तफावत नमूद करण्यात आली आहे. 362 जागांसाठी जेवढे मतदान झाले होते. त्यात 5 लाख 54 हजार 598 मते कमी मोजण्यात आली. त्याचबरोबर 176 जागांसाठी जेवढे मतदान झाले. त्याठिकाणी 35 गजार 93 मते जास्त मोजण्यात आली. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही अनेक जागांवरील प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीत तफावत असल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे. त्यावेळी 347 जागांवर मतांमध्ये तफावत आढळून आली होती.
कोणत्या राज्यात किती तफावत
एडीआरच्या अहवालात यूपीच्या 55 जागांचा उल्लेख करण्यात आला आहे. युपीमध्ये 53, 960 ने कमी मतांची मतमोजणी झाली आहे. 25 जागा अशा आहेत जिथे 6 हजार 124 मते जास्त मोजली गेली आहेत. याशिवाय दिल्लीच्या सर्व 7 जागांवर 8 हजार 159 कमी मतांची मतमोजणी करण्यात आली. तर उत्तराखंडच्या 5 जागांवर 6 हजार 315 कमी मतांची मतमोजणी झाली आहे.
झारखंडमधील लोकसभेच्या एकूण 14 जागांपैकी 12 जागांवर 26 हजार 342 कमी मतांची मतमोजणी करण्यात आली. तर दोन जागा अशा आहे, ज्याठिकाणी एकूण मतांपैकी 393 अधिक मतांची मतमोजणी करण्यात आली आहे. याशिवाय बिहारमधील एकूण 40 जागांपैकी 21 जागांवर 5 हजार 015 मते जास्त मोजली गेली. तर 19 जागांवर एकूण मतांपेक्षा 9हजार 924 कमी मतांची मोजणी झाली आहे.
महाराष्ट्राचा अहवाल काय म्हणतो?
एडीआरच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 मतदारसंघांपैकी 35 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानापैकी 38 हजार 710 इतकी कमी मते मोजण्यात आली. तर 13 मतदारसंघांमध्ये 1 हजार 642 मते अधिक मोजली गेली. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 40 हजार 352 मतांची विसंगती आढळून आली आहे.
धक्कादायक म्हणजे एडीआरच्या अहवालात, मतमोजणीतील सर्वात अधिक विसंगती नांदेड़ लोकसभा मतदारसंघात दिसून आली आहे. याठिकाणी 4 हजार 900 मते मोजलीच गेली नाहीत. तर चंद्रपूर आणि जालना मतदारसंघातही 3 हजारांहून अधिक मतांचा फरक आढळून आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील निवडणुकही चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. याठिकाणी एकूण मतदानापैकी केवळ दोन मते अधिकची मोजण्यात आली. या मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले. या प्रकरणी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.