Skip to main content
Date

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचे समोर आलं आहे. विजयी झालेल्या 1431 उमेदवारांपैकी 12 टक्के म्हणजे 166 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर 9 टक्के म्हणजे 124 उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत एका खासगी स्वयंसेवी संस्थेने अहवाल जाहीर केला आहे. उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात घोषित केलेल्या माहितीवरून हा अहवाल बनवण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. यात 15 विजयी उमेदवारांनी खून आणि खुनाचा प्रयत्न करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट केलं तर 3 विजयी उमेदवारांविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा प्रयत्न करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वच पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होते.