Skip to main content
Source
नवराष्ट्र
Author
anuradha sagar
Date

सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या पहिल्या तीनच्या यादीत भाजपचा एक उमेदवार आणि तृष्णमूल काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत. तथापि, भाजपच्या उमेदवाराकडे सर्वाधिक मालमता आहे.

West Bengal Assembly Elections 2026, ADR Report Bengal Phase 2, Criminal Candidates West Bengal,

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या तारखा जवळ येत आहेत. राज्यातील मतदानाचा पहिला टप्पा २३ एप्रिलला होणार आहे. दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होईल. दरम्यान, बंगालमधील या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांवर देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. एडीआरच्या अहवालानुसार, दुसऱ्या टप्प्यातील एकूण १,४४५ उमेदवारांपैकी ३३८ (२३%) उमेदवारांनी आपल्यावरील गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत.

शिवाय, या उमेदवारांपैकी २९५ (२०%) जणांवर गंभीर गुन्हेगारी खटले आहेत. यापैकी १६ उमेदवारांवर खुनाचे, तर ८० उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. ९४ महिला उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हे उल्लेखनीय आहे की, गुन्हेगारी खटले असलेल्या १०२ भाजप उमेदवारांपैकी ९२ (६५%) जणांवर गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, गुन्हेगारी खटले असलेल्या १४२ टीएमसी उमेदवारांपैकी ४२ (३०%), १०० सीपीआय (एम) उमेदवारांपैकी ४२ (४२%), आणि १४२ काँग्रेस उमेदवारांपैकी ३० (२१%) जणांवर गंभीर गुन्हेगारी कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. सर्वच पक्षांमध्ये कलंकित उमेदवारांचा सुळसुळाट आहे.

२२% उमेदवार कोट्यधीश

२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टण्यातील १,४४५ उमेदवारांपैकी ३२१ म्हणजेव २२% कोट्यधीश उमेदवार आहेत. उमेदवारांची सरासरी एकूण मालमता अंदाजे १.२१
कोटी आहे.

४४% जागा असुरक्षित

दुसऱ्या टप्प्यातील १४२ मतदारसंघांपैकी ६३ म्हणजेच ४४% रेड अलर्टवर आहेत. रेड अलर्ट मतदारसंघ म्हणजे असे मतदारसंघ जिथे तीन किंवा अधिक उमेदवारांनी स्वतःवर गुन्हेगारी खटले असल्याचे जाहीर केले आहे.

सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत कमी मालमत्ता असलेले उमेदवार

सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या पहिल्या तीनच्या यादीत भाजपचा एक उमेदवार आणि तृष्णमूल काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत. तथापि, भाजपच्या उमेदवाराकडे सर्वाधिक मालमता आहे.

दुसऱ्या टप्प्यात, तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता ५.०५ कोटी आढळली, त्यानंतर भाजपची ३.२८ कोटी, माकपाची १.२२ कोटी आणि काँग्रेसची १.०४ कोटी आहे.

दरम्यान, सर्वांत कमी मालमता असलेल्या उमेदवारापैकी चौघांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात शून्य (०) मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. यामध्ये मौशुमी घोष, आसिफ हुसेन, शहजादी परवीन आणि एस. के. हबीब यांचा समावेश आहे.
सर्वात कमी घोषित मालमता असलेले उमेदवार दिलीप संफुई। अपक्ष) आणि शेख मोहिउद्दीन (आमरा बंगाली) आहेत, ज्यांची एकूण मालमत्ता फक्त १,००० आहे.

सर्वाधिक मालमत्ता असलेले प्रमुख उमेदवार

पलाश राणा: हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार असून रायदिघी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची एकूण घोषित मालमत्ता १०४ कोटी रुपये आहे.

समीर चक्रवर्ती: हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे उमेदवार असून त्यांचा मतदारसंघ पांडुआ आहे. त्यांची एकूण मालमत्ता ७६ कोटी रुपये इतकी आहे.

अहमद जावेद: हे देखील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असून ते टाऊन (मालदा) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची मालमत्ता ३९ कोटी रुपये आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात श्रीमंत उमेदवारांचा बोलबाला; तृणमूल काँग्रेस अग्रस्थानी

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ३२१ उमेदवारांच्या विश्लेषणातून राजकीय पक्षांमधील ‘कोट्यधीश’ उमेदवारांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसने सर्वाधिक श्रीमंत उमेदवार मैदानात उतरवले असून, पक्षाच्या एकूण १४२ उमेदवारांपैकी १०३ उमेदवार (७३ टक्के) कोट्यधीश आहेत. त्याखालोखाल भारतीय जनता पक्षाचा क्रमांक लागत असून, भाजपच्या १४१ उमेदवारांपैकी ७३ उमेदवार (५२ टक्के) कोट्यधीश आहेत.

दुसरीकडे, डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये हे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसते. माकपाच्या १०० उमेदवारांपैकी ३३ उमेदवार (३३ टक्के) कोट्यधीश आहेत, तर काँग्रेसच्या १४२ उमेदवारांपैकी ३६ उमेदवारांकडे (२५ टक्के) एक कोटींहून अधिकची संपत्ती आहे. एकूणच, या टप्प्यात सर्वच प्रमुख पक्षांनी धनवान उमेदवारांना अधिक पसंती दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.


abc