Richest Chief Minister in India: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या रिपोर्टमध्ये देशभरातील मुख्यमंत्र्यांची संपत्तीनुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये की कोणाकडे किती मालमत्ता आहे. या यादीत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांपासून ते देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या मालमत्तेचा डेटा शेअर करण्यात आला आहे. ही यादी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.
या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे तब्बल ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेसह पहिल्या क्रमांकावर आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू असून त्यांची संपत्ती ३३२ कोटी रुपये आहे. ADR ने जाहीर केलेल्या या यादीत, हे दोन मुख्यमंत्री अब्जाधीश आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या ताज्या रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांनंतर तयार केलेल्या ३१ मुख्यमंत्र्यांमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत, त्यांची मालमत्ता १५ लाख रुपयांपेक्षा थोडीशी जास्त आहे.
ADR अहवालात ३१ मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता १,६३० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. ADR अहवालात असे म्हटले आहे की ममता बॅनर्जी यांनी १५ लाख रुपयांची मालमत्ता घोषित केली आहे, तर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मालमत्ता ५५ लाख रुपयांची आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे १ कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त संपत्ती असलेले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी मालमत्ता असलेले मुख्यमंत्री आहेत.
